Western Zone Khelo India Women’s Kho-Kho Tournament- पश्चिम विभागिय खेलो इंडिया महिला खो-खो स्पर्धेत मुली आणि किशोरी दोन्ही गटात महाराष्ट्र संघानी कोल्हापूरवर सहज मात करत दुहेरी विजेतेपद पटकावले. मैथिली पवार आणि अश्विनी शिंदे या दोघींची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
मुंबईतील लालबाग येथील ओम साईश्वर सेवा मंडळ पेरू कंपाऊंड, मनोरंजह मैदानावर मुली आणि किशोरी गटातील अंतिम सामने रंगले. त्यामध्ये मुली गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा १६ गुणांनी (३४-१८) असा पराभव केला. महाराष्ट्र संघातर्फे सुहानी धोत्रे (2.10 मि. संरक्षण व 9 गुण), अश्विनी शिंदे (2.30 मि. संरक्षण व 6 गुण), प्रणाली काळे (2.20 मि. संरक्षण व 2 गुण), स्नेहा लामकाणे (3 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-cskvrcb-match-1-learned-match-finishing-from-ms-dhoni-shivam-dubey/
कोल्हापूर संघातर्फे वैष्णवी पवार (1.50 मि. संरक्षण व 2 गुण) हिने चांगला खेळ केला. तसेच तिसरा क्रमांक छत्तीसगडला तर चौथा क्रमांक गुजरात संघाने पटकावला. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट संरक्षक वैष्णवी चाफे (महाराष्ट्र), उत्कृष्ट आक्रमक चैत्राली वाडेकर (कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट खेळाडू मैथिली पवार (महाराष्ट्र) यांची निवड झाली. किशोर गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर 6 गुणांनी (20-14) मात केली.