National Women Kho-Kho League – खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो खो लीग स्पर्धेत रांजणी तालुका आंबेगाव येथील पुर्वा वाघ हीने खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. पूर्वाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी दोन महिन्यात दोन सुवर्ण पदके पटकावण्याची कामगिरी केली आहे.
रांजणी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील विजय व स्वाती वाघ यांची पूर्वा वाघ (Purva Wagh) ही द्वितीय कन्या. वयाच्या ११ व्या वर्षापासून खो खो खेळण्यास सुरुवात केली त्यानंतर कोरोना आला तरी सरावामध्ये मध्ये खंड पडू दिला नाही. शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत १४ व १७ वर्षाखालील दोन्ही स्पर्धेत कांस्य पदक पटकावले त्यानंतर शेतात आई वडिलांना मदत करता करता शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले आणि खेळाचा सरावही केला.
यंदाच्या वर्षी छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली आणि निवड सार्थ ठरवत तिने पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली त्यानंतर भारतीय खेळ प्राधिकरण व भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने ८ ते १० मार्च या कालावधीत जयपुर राजस्थान येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो खो लीग १८ वर्षाखालील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-eliminator-match-to-be-played-between-rcb-and-mumbai-know-the-head-to-head-record-of-both-the-teams/
पूर्वा वाघ हीचा महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये सहभाग होता. पूर्वा वाघ हिच्या चमकदार कामगिरीने महाराष्ट्र राज्य संघाने उपांत्य फेरीत हरियाणा तर अंतिम फेरीत राजस्थानचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पूर्वा सध्या इयत्ता नववी मध्ये नरसिंह विद्यालयात शिक्षण घेत असून ती नरसिंह क्रीडा मंडळाची खेळाडू आहे.