वाघोली, (प्रतिनिधी) –अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाघोली येथील बिजेएस कॉलेजचा खेळाडू अभिजीत दिसले याने वेटलिफ्टिंग (मुले) या क्रीडा प्रकारात 89 किलो वजनी गटात अव्वल कामगिरी करताना 302 किलो वजन उचलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले.
तत्पूर्वी अरुणाचल प्रदेश येथे संपन्न झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. तसेच आंध्रप्रदेश येथे संपन्न झालेल्या दक्षिण-पश्चिम आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत 294 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थ्यानी अभिनंदन केले.