राजगुरुनगर – खेड तालुक्यात 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 23 पैकी 18 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली असून उर्वरित 5 ग्रामपंचायतीवर शिवसेना (ठाकरेगट) व भाजपला सत्ता मिळवता आली. विशेष बाब म्हणजे साकुर्डी, कोरेगाव खुर्द येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने या निवडणुकीच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील येऊनही सत्ता मिळवता आली नसल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
खेड तालुक्यातील 23 पैकी 21 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) 62 केंद्रावर 81.74 टक्के मतदान झाले होते. 23 ग्रामपंचायती पैकी 2 ग्रामपंचायतीची सरपंच व सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली. 23 पैकी 7 गावाचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. 16 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 54 उमेदवार तर ग्रामपंचायतीच्या 110 सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी 233 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.
मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या अधिपत्याखाली झाली. खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मतमोजणी शांततेत झाली.
ग्रामपंचायत …. लोकनियुक्त सरपंच (मते)
सुरकुंडी…कल्पना मयूर लोखंडे (290)
साकुर्डी…रोहिणी शंकर गवारी (638)
आंभु : वत्सला ज्ञानदेव कांबळे (बिनविरोध)
आव्हाट: मोहिनी गणेश मोसे (482)
पापळवाडी : राजू मारुती शिंदे (242)
कोरेगाव खुर्द : आरती सुरेश काळे (423)
मिरजेवाडी : सविता विलास पोखरकर (324)
सिद्धेगव्हाण : दौलत बाळा मोरे (322)
साबळेवाडी : गणेश मारुती काटकर (344)
भांबोली : शीतल काळुराम पिंजण (बिनविरोध)
बहुळ : अश्विनी संदीप साबळे (906)
शेलगाव : वैशाली संतोष औटे (416)
देवोशी : लीला देवराम लव्हाळे (बिनविरोध)
येणिये खुर्द : अनिता योगेश जाधव (161)
अनावळे : अश्विनी भानुदास कुडेकर (बिनविरोध)
येलवाडी : रणजित विठ्ठल गाडे (बिनविरोध)
गारगोटवाडी : वर्षा मनोहर बच्चे (558),
शिरोली : मुदिता संजय देखणे (996)
माजंरेवाडी : अनिता विलास मांजरे (बिनविरोध)
दौंडकरवाडी : सीताराम आनंदा गुजर (714),
चास : विनायक भाऊसाहेब मुळूक (561)
बहिरवाडी : वसुधा अंकुश राक्षे (367)
वाडा : रुपाली शिवाजी मोरे (बिनविरोध)
राष्ट्रवादीचा या ग्रामपंचायतींवर दावा
देवोशी, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, बहुळ, सिद्धेगव्हाण, आंभू, साकुर्डी, शिरोली, कोरेगाव खुर्द, सुरकुंडी, वाडा, पापळवाडी, बहिरवाडी, आव्हाट, चास, मांजरेवाडी, येलवाडी.
भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचयती
भांबोली, अनावळे
ठाकरे गटाचे ग्रामपंचायतींवर यश
येणिये खुर्द, मिरजेवाडी, गारगोटवाडी
राजगुरूनगर : सिद्धेगव्हाण ग्रामापंचायतीत निवडून आलेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.