Anil Deshmukh on Sunil Tatkare। लोकसभा मतदारसंघाच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात शेवटपर्यंत चर्चेत राहणारे दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. यावेळी शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.
मागील काही दिवसांपासून अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. याविषयी देखील अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलंय. आहे. चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज असतील. मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत घ्यायचं नाही हे पवार साहेबांनी सांगितलंय” असा दावा त्यांनी केलाय.
अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ Anil Deshmukh on Sunil Tatkare।
अनिल देशमुखांनी, “शरद पवार ज्या हॉटेलला मुक्कामी होते. ते हॉटेलला सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही,” असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
मोदी जितक्या सभा घेतील तितका मविआला फायदा Anil Deshmukh on Sunil Tatkare।
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही. सिंचन घोटाळ्यावर मोदींनी वक्तव्य केल्यानंतर अजित दादांची धावपळ झाली. आज देशात 200 जागा पार सुद्धा महायुती जिंकणार नाही. नरेंद्र मोदींच्या जितक्या जास्त सभा होतील तितका आम्हाला फायदा होणार आहे. मोदींनी जास्त सभा घ्यावात जेणेकरून महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
अनिल देशमुखांचा दावा जयंत पाटलांनी फेटाळला
दरम्यान, अनिल देशमुख यांचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र फेटाळला आहे. मी आणि शरद पवार एकाच हॉटेलला नाशिकमध्ये मुक्कामाला होतो. मात्र, तटकरे यांची भेट झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं.