“खलनायक’च्या सीक्‍वलमध्ये टायगर?

बॉलिवुडमधील अभिनेता संजय दत्त याने कन्फर्म केले आहे की, त्याच्या “खलनायक’ चित्रपटाचा सीक्‍वलची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. हा चित्रपट 1993मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रीमेक आहे. तसेच संजय दत्तचा “प्रस्थानम’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संजय दत्तने दुबई येथील एका कार्यक्रमावेळी सांगितले की, मी दुस-यांच्या बाबतीत काहीही सांगू शकत नाही. परंतु आम्ही निश्‍चितच खलनायक चित्रपटाचा सीक्‍वल संजय एस दत्त प्रॉडक्‍शन हाउसच्या बॅनरखाली तयार करू. या चित्रपटाची तयारीही सुरू झाली असून मुख्य भूमिकेसाठी टायगर श्रॉफला अप्रोच करण्यात आले आहे.

या सिक्‍वलबाबत संजय दत्तने जास्त माहिती दिली नाही. परंतु या चित्रपटात टायगर हा जॅकी आणि माधुरीच्या मुलाची भूमिका साकारणार असल्याचे समजते.

दरम्यान, “खलनायक’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. ज्यात संजयशिवाय जॅकी श्रॉफ आणि माधुरी दिक्षित यांनी आपला दमदार अभिनय सादर केला होता. संजय दत्तच्या कारकिर्दीला कलाटली देणारा “खलनायक’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या यशानंतर त्याने अनेक हिट चित्रपट दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×