नवी दिल्ली – पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी आतापर्यंत अमृतपाल सिंहच्या 78 साथीदारांना अटक केली असून, या आरोपींना डिब्रुगडला नेण्यात आले आहे.
खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपालचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांनी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. अश्यातच, आता पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. अमृतपाल सिंहच्या शोधात असलेल्या पंजाब पोलिसांनी तब्बल 23 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अमृतपालच्या जवळच्या पप्पलप्रीतला अमृतसर ग्रामीणमधून अटक केली आहे.
Radical preacher Amritpal Singh’s close aide Papalpreet Singh arrested in Hoshiarpur, say Punjab police officials
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
पप्पलप्रीत हा अमृतपालचा सल्लागार आहे. तो फरार झाल्यापासून अमृतपालसोबत सावलीसारखा राहत होता. आता तो देखील पंजाब पोलिसांच्या हाती लागला आहे. पप्पलप्रीत सिंग हा अमृतपालचा माध्यम सल्लागार देखील आहेत. पोलिसांच्या माहिती नुसार तो राज्यात दहशतवाद पसरवण्याचा कट देखील रचत होता.