मुंबई – बॉलिवूडचा बॉक्स ऑफिस किंग सलमान खान या वर्षाच्या अखेरीस त्याचा पुढचा चित्रपट ‘किसी का भाई किसी का जान’ घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता आणि तो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाचा पारा चढला होता. आता लोक या चित्रपटाच्या टीझर-ट्रेलरकडे टक लावून पाहत आहेत.
दरम्यान, अश्यातच या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमान खानाच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. आज (दि. 10) ‘किसी का भाई किसी का जान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, यामध्ये सलमानचा दमदार एक्शन मूड पाहायला मिळत आहे.
तसेच, अभिनेत्री पूजा हेगडेचा देखील रोमँटिक अंदाज दिसून आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. सध्या सोशल मीडियावर फक्त याच चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमान खान काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटात कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.