पुणे : भाजपची तिसरी यादी जाहीर झाली असून, या यादीतही जेष्ठ नेते एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मंत्री चंद्रशेखर बनवणंकुंळें, प्रकाश मेहता यांना स्थान मिळालेले नाही.
तिसऱ्या यादीत शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा यांना रामटेकमधून डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली मतदारसंघातून परिणय फुके यांना तर मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान आजच पक्ष सदस्यत्व स्वीकारलेल्या नितेश राणेँचाही समावेश नसल्याने त्यांच्या भवितव्य विषयी अनिश्चितता व्यक्त होत आहे.
भाजपकडून आतापर्यंत १४३ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. खडसे हे आपल्या कन्येला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. भाजपचे अजून काही उमेदवार घोषित करणे बाकी असल्याने मुक्ताईनगरची उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता ताणली गेली आहे.