पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली: दिल्लीच्या कोर्टाने आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत मुदतवाढ देण्याची विनंती सीबीआयने केली होती. त्यानंतर विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

तसेच चिदंबरम यांनी आरोग्याशी संबंधित समस्येचे कारण सांगून तिहार तुरुंगात घरगुती भोजन देण्याची विनंती केली होती. कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली आहे. पी. चिदंबरम यांना कारागृहामध्ये घरी शिजवलेले भोजन दिले जाईल.

21 ऑगस्ट रोजी सीबीआयने चिदंबरम यांना जोर बागेत त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. चिदंबरम यांच्यावर 2007 मध्ये अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आयएनएक्स मीडिया ग्रुपला 305 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीस मान्यता देण्याच्या कथित अनियमितते प्रकरणी सीबीआयने 15 मे 2017 रोजी एफआयआर नोंदविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.