पॅरीस : येथील पोलिस मुख्यालयात एका चाकूधारी व्यक्तीने चार अधिकाऱ्यांची भोसकून हत्या केली. हा हल्लेखोर पोलिस कर्मचारीच असून त्याला गोळी घालून कंठस्नान घालण्यात आले.
पोलिस मुख्यालय असणारा पॅरीसचा मध्यवर्ती भाग या घटनेनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस अदिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्याच्या निषेधार्थ पोलिसांनी संप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. फ्रान्सचे गृहमंत्री ख्रिसतोपे कॅस्टानेर घटनास्थळावर पोहोचले आहेत.