पुणे, मेट्रोकडून – खडकी पोलीस स्टेशन ते रेल्वे भुयारीमार्ग या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण आणि रेल्वे भुयारीमार्गाजवळ मेट्रोचे गर्डर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे दि. २७ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत खडकी वाहतूक विभागाकडून वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले.
वाहने आणि रेंजहिल्स परिसरातील नागरिकांची चर्च चौकाकडे येणारी वाहने क्राईम युनिट ४ सर्कलजवळून पोल्ट्री अंडरपास येथून इच्छितस्थळी जातील. तर, औंधकडून खडकी पोलीस स्टेशनकडे (चर्च चौक / संविधान चौक) जाणारा रस्ता साई चौक येथे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक साई चौक येथून उजवीकडे रेंजहिल्स इस्टेट रोड मार्गे खडकी मिलिटरी हॉस्पिटल, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमार्गे इच्छितस्थळी जातील, असे वाहतूक विभागाने सांगितले सिम्फनी सर्कलकडून येणारी आहे.