लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या 61 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे यातील मुख्य मतदारसंघांमध्ये अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, प्रयागराज, अयोध्या आणि गोंडा या जिल्ह्यातील मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत.
या टप्प्यातील मतदार संघांमध्ये सिरथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, रामपूर खासमधून कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा, कुंडा मतदारसंघातून अपक्ष आमदार रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैया हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.