मुंबई – KGF चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता बीएस अविनाश याचा बुधवारी बंगळुरूमध्ये कार अपघात झाला. वृत्तानुसार, अविनाशची कार मर्सिडीज बेंझ ट्रकला धडकली. मात्र सुदैवाने तो थोडक्यात बचावला.
अविनाशच्या गाडीचा अपघात
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी 6 वाजता अविनाश अनिल कुंबळे सर्कलजवळ जात असताना एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून कब्बन पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांनी अविनाशला गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. रिपोर्ट्सनुसार, अविनाश सकाळी वर्कआउटसाठी जिममध्ये जात होता.
केजीएफमध्ये अँड्र्यूची भूमिका साकारली होती
यश-स्टारर KGF मालिकेत, अविनाशने अँड्र्यू नावाची व्यक्तिरेखा साकारली होती जो एका स्थानिक टोळीचा बॉस होता. KGF च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात त्याची भूमिका मोठी होती. दिवंगत अभिनेते चिरंजीवी सर्जा यांच्या माध्यमातून अविनाशला KGF चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
KGF: चॅप्टर १ पासून ऑफर येऊ लागल्या
अविनाशने त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याने 2015 पासून KGF: Chapter 1 चे प्रशिक्षण सुरू केले होते. केजीएफच्या पहिल्या भागातनंतर त्याला प्रस्ताव मिळू लागल्याचेही त्याने उघड केले.