हिवाळा (Winter) सुरू झाला आहे. दिवसेंदिवस थंडी वाढू लागल्याने बरेच जण गिझर खरेदी करण्याचा विचार करत असतील. मेट्रो शहरांमध्ये गीझर हे अत्यावश्यक घरगुती उपकरण बनले आहे. गीझर (buying geyser) घेण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला नंतर पस्तावाच लागेल. पश्याताप टाळण्यासाठी पुढील गोष्टी नक्की लक्षात घ्या. (geyser Low prise)
गिझरचे प्रकार
साधारणपणे स्टोरेज आणि इन्स्टंट प्रकारचे दोन गिझर बाजारात उपलब्ध आहेत. स्टोरेज गीझर पाणी गरम करतो आणि साठवतो, तर इन्स्टंट गीझर आपल्याला आवश्यक असेल तेव्हा पाणी गरम करतो. इन्स्टंट गीझरमधील वीज वापर थोडा जास्त आहे आणि मोठ्या कुटुंबासाठी तो योग्य नाही. (five star geyser)
गिझरचा आकार
जर तुम्हाला किचनसाठी गरज असेल तर इन्स्टंट गीझर योग्य आहे. जर कुटुंबात 2-3 लोक असतील तर तुम्ही 15 लिटरचा स्टोरेज गिझर घ्या. 4 पेक्षा जास्त सदस्य असल्यास, 35 लिटरचा गिझर योग्य असेल. (Best geyser)
डिझाईन आणि आकार
गिझर खरेदी करताना डिझाईनची पूर्ण काळजी घ्या. जागेची अडचण नसेल तर कोणत्याही प्रकारचे गिझर घेता येईल, मात्र जागा कमी असेल तर त्यानुसार दंडगोलाकार किंवा चौकोनी डिझाइन केलेले गिझर निवडा. (Top five geyser)
स्टार रेटिंग
गीझरचे सौदे काही दिवसांसाठी नसतात, त्यामुळे त्याच्या ऊर्जा रेटिंगकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही कमीत कमी 4 स्टार रेटिंग असलेले गिझर खरेदी करावे. यामुळे विजेची मोठी बचत होईल आणि ती दीर्घकाळ वापरणे ओझे होणार नाही.
सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि ब्रँड मूल्य
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. सेफ्टी व्हॉल्व्ह, ऑटो कटऑफ फीचर आणि फेल सेफ मेकॅनिझम यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये तपासल्यानंतरच गिझर खरेदी करा. नेहमी चांगल्या आणि विश्वासार्ह ब्रँडचे गिझर खरेदी करा. (Chipest geyser)