शिरूर – आपल्या घराबरोबरच परिसरासह शिरूर शहरात स्वच्छता राखून ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करा. नगरपरिषदेच्या घंटा गाडीतच कचरा टाकून शिरूर शहर कचरा व प्लॅस्टीकमुक्त करा. तसेच स्वच्छ व सुंदर शिरूर शहर करण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नागरिकांना केले.
स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने शहरात प्लॉगेथॉन ड्राइव्ह काढण्यात आला. यामध्ये शहरातील विविध 22 भागांमध्ये संबंधित नगरसेवक, विविध शाळांचे विद्यार्थी, सामाजिक संघटना, बचत गट, पत्रकार, नागरिक सहभागी झाले होते.
अंदाजे 1500 लोकांनी सहभाग घेतला. प्लॉगेथॉन ड्राइव्ह चालत चालत डोळ्यांना दिसणारा सुका कचरा, प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छतेचे महत्व नागरिकांना सांगताना मुख्याधिकारी रोकडे बोलत होते.
यावेळी स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विनोद भालेराव, नगरसेवक विठ्ठल पवार, संदीप गायकवाड, निलेश गाडेकर, मंगेश खांडरे, संजय देशमुख, अभिजीत पाचर्णे, नगरसेविका संगीता मल्लाव, पुजा जाधव, सुनिता कुरंदळे, उज्वला बरमेचा, रेश्मा लोखंडे, मनिषा कालेवार, अंजली थोरात, उज्वला वारे, रोहिणी बनकर, सुरेखा शितोळे, ज्योती लोखंडे, यांसह रयत शाळा, विद्याधाम शाळा, आर. एम. डी. इंग्लिश मिडीयम, आयेशा बेगम हायस्कूल, जीवन विकास, नगरपरिषद शाळा क्र. 6, लोकसेवा ट्रस्ट शहरातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, आदिशक्ती महिला मंडळ, ऍक्टीव ग्रुप, वात्सल्य सिंधू, पोलीस भरती प्रशिक्षण विद्यार्थी, साधना परिवार, शिरूर बार असोसिएशन, एस. एस. वाय. ग्रुप, जनसेवा रिक्षा संघटना, जिजामाता सोसायटीतील नागरिक, शिरूर केमिस्ट असोसिएशन, जनविकास फाऊंडेशन, शिरूर एन्व्हायरमेंट यांसह संजय बाराहते, संतोष शिंदे, प्रवीण गायकवाड, वैशाली काळे, सतीश धुमाळ, मुकुंद ढोबळे, भाऊसाहेब खपके, अप्पासाहेब ढवळे, बबन वाघमारे आदि शहरातील पत्रकार बांधव स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू झाले असून, शिरूर नगरपरिषद या स्पर्धेत सहभागी झाली असल्याने स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.