रांजणगाव गणपती – 29 डिसेंबर 2019 रोजी नाशिक जिल्ह्यातील फ्रावशी ऍकॅडमी येथे झालेल्या तिसऱ्या आझाद चषक राज्य कराटे चॅम्पियनशिपमध्ये रांजणगाव येथीेल चॅम्पियन्स कराटे क्लबच्या 3 खेळाडूंनी भाग घेतला. संघाने एकूण 7 पदके जिंकली (5 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य पदक) व काता, कुमिते आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स फेरी मधे प्रवेश मिळवला.
गणपत सोनटक्के यांना चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्समध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्यामुळे त्यांना एक नवीन सायकलदेखील देण्यात आली. प्रणव गायकवाडने त्याच एक सुवर्ण पदकासह कॅटेगरीमध्ये तिसरे स्थान पटकावले. सुहास भाकरे याला 2 सुवर्णपदक मिळाले.
गणपत सोनटक्के याला दोन सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले या खेळाडूंना शरद फंड, तेजस शेळके, निखील लांडे यांनी मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंचा सत्कार जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर पाटील यांनी केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.