केडगाव -करोनाच्या प्रादुर्भावामुळे केडगाव – बोरिपार्धी येथील बाजारपेठ परिसरात कडकडीत बंद पाळला. मेडिकल आणि दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवले आहेत.
मागील काही दिवसात केडगाव –
बोरिपार्धी येथील करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच अजित शेलार यांनी दिली. बाधितामध्ये अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आले तरी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून केडगाव बाजारपेठ बंद ठेवली आहे.