सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या हजारपार झाली आहे. जिल्ह्यातील ३९ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने सोमवारी सकाळी दिली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १०१२ झाली आहे.
विविध रुग्णालयांत व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील ३९ नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या ३९ जणांमध्ये…
खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील २० वर्षीय महिला,
जावली तालुक्यातील रामवाडी येथील २७ व ४८, ३० वर्षीय महिला, ५ वर्षाचा बालक, आखेगनी येथील ६८ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील ४६ वर्षीय पुरुष, चचेगाव येथील ४०, २०, ४५, ६५ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगी, २० वर्षीय युवक, ८ वर्षाचा मुलगा, उब्रंज येथील ४७ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, मसूर येथील १० वर्षाचा मुलगा, ५० वर्षीय महिला, ५६, २७, २३ वर्षीय पुरुष
पाटण तालुक्यातील सांघवड येथील ३१ वर्षीय पुरुष
फलटण तालुक्यातील जिंती येथील ४४ वर्षीय महिला, रविवार पेठ येथील २६, २७ वर्षीय महिला, ९, ६, ४ वर्षाची मुलगी, ७ वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील वाघजाईवाडी येथील ४४ वर्षीय महिला, पसरणी येथील ४७ वर्षीय महिला, कवठे येथील ३५ वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील ५३ वर्षीय पुरुष कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील ३४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.