Earthquake in 2023 : भूकंपाच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष अत्यंत धोकादायक ठरले आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यातच म्हणजेच जानेवारीत ५.८रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या वर्षी १२४ वेळा भूकंप झाल्यामुळे पृथ्वी हादरल्याची माहिती समोर आली आहे. याविषयीची माहिती नुतीच केंद्र सरकारकडून लोकसभेत सादर करण्यात आली.
वर्षाची सुरुवात २४ जानेवारी रोजी ५.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने झाली. त्यानंतर ३ ऑक्टोबरला ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला आणि 3 नोव्हेंबरला ६.४रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे नेपाळमध्ये प्रचंड विध्वंस झाला. नेपाळ हे तिन्ही भूकंपांचे केंद्र होते आणि भारताच्या डोंगराळ भागापासून दिल्ली-एनसीआरपर्यंत पृथ्वी हादरली.
लोकसभेत 4 वर्षांची आकडेवारी सादर करताना केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी, २०२० ते २०२३ या चार वर्षांत या वर्षी सर्वाधिक भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. 2021 मध्ये सर्वात कमी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्या वर्षी 60 वेळा भूकंप झाले. 2020 मध्ये 61 वेळा आणि 2022 मध्ये 65 वेळा भूकंपाचे हादरे बसल्याचे सांगितले.
२०२३ मध्ये पृथ्वी 124 वेळा हादरली.
दरम्यान, १२४ भूकंपांपैकी ९७ भूकंप ३ ते ३.९ तीव्रतेचे होते, तर २१ भूकंप असे होते ज्यांची तीव्रता ४ ते ४.९ इतकी होती. याशिवाय 5 ते 5.9 तीव्रतेचे 4 भूकंप आणि 2 मोठे भूकंप झाले ज्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6 ते 6.9 इतकी होती.
भूकंप किती धोकादायक आहे?
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जाते. शून्य ते १.९ तीव्रतेचे धक्के जाणवत नाहीत, परंतु २ ते २.९ तीव्रतेचे सौम्य धक्के जाणवू शकतात. 3 ते 4.9 तीव्रतेचे धक्के बऱ्यापैकी ओळखता येतात, परंतु त्यांची तीव्रता 5 पेक्षा जास्त असेल तर पंखे थरथरायला लागतात आणि बेडवर किंवा खुर्चीवर बसूनही थरथर जाणवते. त्याच वेळी 6 च्या वर तीव्रतेचा भूकंप झाल्यास इमारतींचे नुकसान होते. ७ आणि ८ रिश्टर स्केलच्या भूकंपात इमारती कोसळू शकतात. यामुळे विनाश होऊ शकतो. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानमध्ये एकापाठोपाठ ७.५ आणि ७.८ तीव्रतेचे अनेक भूकंप जाणवले. या विनाशकारी भूकंपामुळे तुर्कस्तानमध्ये प्रचंड विध्वंस झाला, ज्यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला.
२०२३ मध्ये सर्वाधिक भूकंप का झाले
किरेन रिजिजू यांनी , यावर्षी भूकंपाचे सर्वाधिक धक्के बसल्याचे कारण सांगताना त्यांनी भारत आणि नेपाळमधील भूकंप अल्मोडा फॉल्टमुळे झाले आहेत, असे म्हटले. तसेच पुढे बोलताना , पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंप झाले आहेत. त्यामुळे २४ जानेवारी (५.८ रिश्टर स्केल), 3 ऑक्टोबर (६.२ रिश्टर स्केल) आणि ३ नोव्हेंबर रोजी (६.४ रिश्टर स्केल) मोठे भूकंप झाले, असे त्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. ते म्हणाले की, हे भूकंप आणि त्यांच्या आफ्टरशॉकमुळे२०२३ मध्ये भूकंप वारंवारता वाढली आहे.
अल्मोडा फॉल्ट काय आहे?
अल्मोरा फॉल्ट हा पश्चिम-वायव्य-पूर्व-आग्नेय दिशेला असलेला उच्च कोनाचा ट्रेंडिंग प्लेन आहे, जो आतील लेसर हिमालयाच्या गढवाल समूहाला दक्षिणेकडील बाह्य लेसर हिमालयाच्या जौनसर आणि दुडाटोली गटांपासून वेगळे करतो. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंप झाले आहेत.