मुंबई – बॉलीवूडमध्ये काही दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या अफेयरची जोरदार चर्चा रंगत आहे. या दोघांना अनेक वेळा एकत्रित स्पॉट करण्यात आलेले असले तरी दोघांनी कधीही अफेयर असल्याचे सांगितले नाही. त्यातच पुन्हा एकदा विकी कौशलला कतरिना च्या घरी स्पॉट करण्यात आले. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या दोघांनी एकत्र पार्टी केल्याचंही समजतंय.
View this post on Instagram
एकीकडे विकी आणि त्याचा भाऊ सनी कौशलने अलिबागमधील काही फोटो पोस्ट केले. तर दुसरीकडे कतरिना आणि तिची बहीण इसाबेलसुद्धा अलिबागमध्येच आहेत. त्यामुळे हे चौघं एकत्र असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.
View this post on Instagram
यापूर्वीही विकी कौशलला सकाळच्या वेळी कतरिनाच्या घरी पाहिल्यानंतर चर्चा रंगू लागल्या होत्या. कतरिनाच्या घरी विकीला स्पॉट करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. लॉकडाउन संपल्यानंतर एका रविवारीही तो कतरिनाच्या घरी गेला होता.
View this post on Instagram
विकी कौशलच्या “भूत पार्ट वन – द हॉन्टेड शिप’च्या स्क्रीनिंगवेळीही कतरिना हजर होती. आता या जोडीला एकाच चित्रपटात काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, विकी यापुर्वी अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करता होता. परंतु गेल्यावर्षी दोघांचा ब्रेकअप झाला होता. दुसरीकडे कतरिना आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत होते आणि लिव-इनमध्येही राहत होते.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कतरिनाचा “सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार झळकणार आहे. तर विकी कौशल शूजित सरकारच्या “सरदार उधम सिंह’मध्ये काम करत आहे. याशिवाय तो “तख्त’मध्येही झळकणार आहे.