अक्षय कुमार ने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एक इलक्ट्रिक सॉकेट दाखवले आहे. त्याच्या जवळच एक बेडूक बसलेला आहे. कॅप्शनमध्ये अक्षयने म्हटले की “मला माझा फोन चार्ज करायचा होता पण चार्जिंगसाठी इलक्ट्रिक सॉकेट बेडकाच्या ताब्यात असल्याने मी काही करू शकलो नाही.’ अक्षय कुमारच्या या फोटोला फॅन्सकडून खूप लाईक मिळाले आणि मजेदार कमेंट नाही पडल्या आहेत.
View this post on Instagram
अक्षय कुमारने “गुड न्यूज’ आपल्याला सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो घोड्यावर बसून नागिण डान्स करताना दिसतो आहे.
View this post on Instagram
अक्षयने व्हिडीओची तुलना 2020 या वर्षाशी केली आहे. या वर्षात बरेच उतार-चढाव आल्यामुळे आपल्याला असेच नाचावे लागले असल्याचे त्याने म्हटले आहे. “अतरंगी रे’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. त्याशिवाय “बेल बॉटम’,”बच्चन पांडे’,”रक्षाबंधन’,”पृथ्वीराज’,”सूर्यवंशी’ सारखे एकापाठोपाठ एक रिलीज होणार आहेत. त्याच्या सिनेमांच्या व्यस्त वेळापत्रकातून मजेशीर किस्से सोशल मिडीयावर शेअर करण्यासाठी त्याला वेळ कसा मिळतो, हे अक्षयलाच माहिती.