मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ लॉकडाऊननंतर लवकरच ऍक्शन मोडमध्ये येणार आहे. ती आपल्या आगामी “टायगर-3′ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार अहे. यात तिच्यासोबत सलमान खान मुख्य नायक म्हणून काम करणार आहे. तो सध्या “राधे : योर मोस्ट वॉटेड भाई’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शेड्यूल 8 महिन्यांचे असून तो अनेक देशांत शूट करण्यात येणार आहे.
टायगर सिरीजमधील या चित्रपटाच्या मागील दोन चित्रपट “एक था टायगर’ आणि “टायगर जिंदा है’मध्येही सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दर्शविली होती.
सध्या सलमान खान आणि आदित्य चोप्रा यांच्यात चित्रपटासंबंधात चर्चा सुरू आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार पार पडल्यास 2022 च्या ईदला टायगर फ्रॅंचाइजीचा हा तिसरा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. टायगर- 3 च्या निर्मितीवर 200 ते 250 करोड रुपयाचा खर्च केला जाणार आहे. आतापर्यंतच्या बॉलीवूड इतिहासातील सगळ्यात मोठी किंमत यासाठी वापरली जाणार आहे. चित्रपटाच्या प्रिंट आणि पब्लिसिटीवर 20 ते 25 रुपये खर्च केले जाणार आहेत. या अहवालानुसार या सिनेमासाठी सलमान खान 100 करोड इतके मानधन घेणार आहे. एकंदरित सर्व खर्च पाहता या फिल्मसाठी 350 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा सिनेमा सर्वात महागडा सिनेमा ठरणार आहे.