अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. डेटिंग केल्यानंतर दोघांनी २०२१ साली मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या काही वर्षानंतर कतरिना आई होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. प्रेग्नेंट असल्याची चर्चाही सोशल मीडियावर नेहमीच रंगते, मात्र आता कतरिनाचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेग्नेंटच्या अफवांवर पूर्णविराम लागला आहे.
View this post on Instagram
कतरिना कैफ मुंबईत हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. नववधूप्रमाणे सजून पती विकी कौशलसोबत करवा चौथचे व्रत साजरे केल्यानंतर ती पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसली. चाहते तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले. तसेच बेबी बंप असे काही होत नाही याकडेही काही लोकांचे लक्ष वेधण्यात आले. म्हणजे ती गरोदर नाही. अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘कतरिना प्रेग्नंट आहे…’ अशा चर्चा सर्वत्र सुरू होत्या. कतरिना सैल कपडे आणि सलवार सूटमध्ये स्पॉट होत असल्याने लोकांना वाटले की ती आई होणार आहे आणि तिचा बेबी बंप लपवत आहे.
कतरिना कैफ ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि इमरान हाश्मी हा सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने कलाकारांनी आता चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी केली आहे.
‘टायगर 3’ व्यतिरिक्त कतरिना ‘मेरी ख्रिसमस’मध्ये विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधुन’ सारखे उत्तम चित्रपट बनवणारे श्रीराम राघवन हा चित्रपट बनवत आहेत.