बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या दमदार अभिनय आणि डान्सचा जलवा दाखवित अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कतरिनाचे भारतासह विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असल्याने तिची फॉओअर्सची संख्याही खूप मोठी आहे. त्यातच आता इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 4 कोटींवर गेली आहे. यानिमित्त कतरिनाने पोस्ट केले की, सर्वांना चार कोटी इतक्या साइजचा हग.
कतरिनाने तिच्या काही निवड लोकप्रिय इन्स्टाग्राम पोस्टचे कोलाजही शेअर केले आहे. यात लॉकडाऊन दरम्यान चित्रीत करण्यात आलेल्या काही व्हिडिओंचा समावेश आहे. ज्यामध्ये ती साफसफाई दरम्यान झाडूसह क्रिकेट खेळताना, स्वयंपाकघरातील भांडी धुताना, स्वयंपाक करताना दिसू शकतो. कतरिनाची बहीण इसाबेल कैफने हे व्हिडिओ चित्रित केले आहेत.
कतरिनाने 2017मध्ये इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले होते आणि त्यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कतरिना लवकरच रोहित शेट्टीच्या ऍक्शन ड्रामा “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. हा चित्रपट सिनेमागृह सुरू होताच प्रदिर्शत होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाकडून कतरिनाला खूप अपेक्षा आहेत. याशिवाय तिने अनेक बिग बजेट चित्रपटाही साईन केलेले आहेत.
View this post on Instagram
The game of energy has changed ⚡#ZIGKinetica 🏃🏻♀️ #EnergyAmplified #SportTheUnexpected @reebokindia