Bhool Bhulaiyaa 3 । बॉलिवूडचा चॉकलेट अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दर आठवड्याला या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट्स येत असते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. कार्तिक आर्यनने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अभिनेत्याने सांगितले की, चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
कार्तिक आर्यनने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर भूल भुलैया 3 च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन आणि ॲनिमल अभिनेत्री तृप्ती क्लॅप बोर्डच्या मागे उभे असल्याचे दिसत आहे.
फोटो फोटोत दोन्ही कलाकारांचे अर्धे चेहरे दिसत आहे. या फोटोतील मुख्य कलाकारांच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक त्याच्या रुह बाबा लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर कापड बांधून टाळी, हातात जपमाळ आणि अंगठी आहे. तर तृप्ती डोळ्यात काजल आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे.
अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे,’टिंग टिंग टिंग टिडिंग.. आम्ही भूल भुलैयाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. हा छोटासा ब्रेक मला खूप उत्साहित करत आहे. यासोबतच अभिनेत्याने लिहिले की, यावेळी रूह बाबाच्या टोपीमध्ये वेगळीच जादू आहे.’ असं लिहत त्याने या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे.
अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. टी सीरीज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीसोबतच माधुरी दीक्षित आणि भूल भुलैयाचे मूळ भूत विद्या बालन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने त्याची फी दुप्पट केली आहे. या चित्रपटासाठी ती 80 लाख रुपये मानधन घेत आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’साठी तृप्तीला 40 लाख रुपये फी देण्यात आली होती.
हे वाचले का ? ‘बिग बॉस मराठी’ची शिव ठाकरेकडून पोलखोल,’बक्षिसाची रक्कम 25 लाख पण …’