Kartik Aaryan New Film| बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो ‘भूल भुलैया 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातही भूमिका साकारत आहे. याचदरम्यान त्याच्या हाती आणखी एक नवा चित्रपट लागला आहे. कार्तिक लवकरच विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मागील काही दिवसांपासून कार्तिक आर्यन आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्याबाबात सिनेपत्रकार राहुल राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, साजिद नाडियादवाला यांची निर्मिती असलेल्या चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज एकत्र येत आहेत. कार्तिक आर्यन दाऊद इब्राहिमला नडलेल्या हुसैन उस्तरा याची भूमिका साकारणार आहे.
कार्तिक आर्यन दिसणार डॉनच्या भूमिकेत
या चित्रपटात कार्तिक आर्यन डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तो डॉन अर्जुन उस्ताराची भूमिका साकारणार आहे. हा तोच प्रोजेक्ट आहे, जो विशाल भारद्वाज एकेकाळी दिवंगत अभिनेता इरफान खान आणि दीपिकाला सोबत घेऊन बनवत होते. दरम्यान, जुन्या स्क्रिप्टमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी विविध समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. वर्षांनंतर आता तो कार्तिक आर्यनसोबत बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.
अद्याप या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. परदेशातही याचे चित्रीकरण केले जाणार आहे. सध्या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्रीची निवड झालेली नाही. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.
कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, ‘चंदू चॅम्पियन’, ‘भूल भुलैया 3’ ते ‘आशिकी 3’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा:
विजय देवरकोंडाने पहिला फिल्मफेअर पुरस्काराचा केला लिलाव; कारण वाचून करालं कौतुक