Sai Tamhankar New Film| अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही केली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत ती मिमी या चित्रपटात झळकली होती. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. तिच्या अभिनयासाठी तिला पुरस्कार देखील मिळाला. नुकतीच तिचा ‘भक्षक’ चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यानंतर आता ती इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत काम करणार आहे.
इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये झळकणार आहे. सई या दोन्ही प्रोजेक्ट्सचा भाग असणार आहे. सई ताम्हणकर हिच्या ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या दोन्ही आगामी प्रोजेक्टच्या घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या स्लेट मधून करण्यात आली आहे. Sai Tamhankar New Film|
सई ताम्हणकरने तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितले की, “एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्टवर एक्सेल काम करते. त्यामुळेच त्यांच्या सोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे. आता मला त्यांच्यासोबत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळत आहे.” Sai Tamhankar New Film|
‘अग्नी’ आणि ‘ग्राउंड झिरो’ सह सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्येही झळकणार आहे. या वर्षाच्या अखेर नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये शबाना आझमी यांच्यासह ज्योतिका,, निमिषा सजयन, शालिनी पांडे, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता हे कलाकार देखील दिसणार आहेत. सईच्या या आगामी चित्रपटांची चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा:
नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडू संतापले; जाहीर केली भूमिका