Kartik Aaryan New Car । अभिनेता कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील उगवत्या स्टार्सपैकी एक आहे. आता या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपट दिले आहे. अनेक दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटात कार्तिकला कास्ट करायचे आहे. कार्तिक केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या लूकमुळेही नेहमीच चर्चेत असतो. कार्तिक आणखी काही कारणाने चर्चेत आला आहे. कार्तिकने त्याच्या कार कलेक्शनमध्ये एका आलिशान कारचा समावेश केला आहे.
View this post on Instagram
कार्तिक आर्यनने त्याच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हरचा समावेश केला आहे. अभिनेत्याने त्याच्या कार त्याच्या कारची विधीवध पूजा केली. कार्तिकचे त्याच्या नवीन कारसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. पहिल्या फोटोत अभिनेता गाडीची पूजा करताना दिसत आहे. पुढील फोटोत कार्तिक नारळ फोडताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्यासोबत त्याचे आई-वडील आणि त्याची लाडकी पाळीव प्राणी कटोरी देखील दिसत आहे.
या फोटोंशिवाय कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या नवीन कारचा फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. कार्तिक त्याच्या कारच्या ट्रंकमध्ये झोपून फोटो कढताना दिसत आहे. या पोस्टसोबत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘आमची रेंज थोडी वाढली आहे’
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन लवकरच ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 14 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक ‘भूल-भुलैया ३’मध्येही दिसणार आहे. अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे.
हे वाचाल का ? PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण?