Shiv Thackeray । रिऍलिटी शोबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. मराठीसह त्याने हिंदी बिग बॉसमध्ये देखील उत्तम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली.
हिंदी बिग बॉसच्या 16 व्या पर्वात झळकल्यानंतर त्याने रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 13 ‘ मध्ये सहभाग घेतला. नुकताच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यानंतर आता शिव एका पाठोपाठ एक रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत आहे. ‘खतरों के खिलाडी 13 ‘ संपताच शिव ठाकरे ‘झलक दिखला जा 11’मध्येही दिसला होता.
शिव ठाकरे याने मागील काही वर्षात रिऍलिटी शो करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात त्याने एका रिऍलिटी शोबाबत मोठा खुलासा केला आहे.
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्ट शोमध्ये शिव ठाकरेने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने बिग बॉसच्या बक्षिसाच्या रकमेबद्दल खुलासा केला.
तो म्हणाला की त्याला जिंकलेल्या रकमेतून अर्धेसुद्धा पैसे मिळाले नव्हते. ‘बिग बॉस मराठी 2’च्या विजेत्याला 25 लाख रुपये मिळाले अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी ट्विस्ट आणला.
त्यामुळे फिनालेच्या काही तास आधी बक्षिसाची रक्कम आठ लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती. यानंतर कॅश प्राइज 17 लाख रुपयांवर येऊन पोहोचलं होतं. शिव ठाकरेने पुढे सांगितलं की त्या 17 लाख रुपयांमधूनही त्याला फक्त 11.5 लाख रुपयेच मिळाले होते. यातूनही काही पैसे कापले गेले होते. यामध्ये त्याच्या कुटुंबीयांच्या विमानप्रवासाची तिकिटं आणि काही कपड्यांचा बिल समाविष्ट होता. असेही त्याने सांगितले आहे.
हे वाचलं का ? भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन -तृप्ती डिमरीची दिसणार ‘केमेस्ट्री’