Entertainment : ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) रोमँटिक सीन देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी (Tripti Dimri). या चित्रपटातील यशस्वी कामगिरीनंतर आता 2023 हे वर्ष संपण्यापूर्वीच तृप्तीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे. तृप्ती डिमरी लवकरच कार्तिक आर्यनसोबत (Karthik Aryan) एका नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अनुराग बसू आणि भूषण कुमार यांनी तृप्ती डिमरी यांना त्यांच्या आगामी ‘आशिकी 3’ चित्रपटासाठी तिला साइन केल्याचे म्हंटले जात आहे.
रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी आता ‘आशिकी 3’मध्येही कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. काही काळापूर्वी या रोमँटिक चित्रपटासाठी कार्तिकचे नाव फायनल करण्यात आले होते. आता अभिनेत्री म्हणून तृप्तीचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ‘आशिकी 3’ हा या फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन अनुराग बासू करत आहेत. निर्मात्यांच्या मते, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी ही जोडी ‘आशिकी 3’साठी योग्य पर्याय आहे आणि ही जोडी रुपेरी पडद्यावर खळबळ उडवून देईल.
View this post on Instagram
चित्रपटाचे शूटिंग कधी होणार सुरू ?
तृप्ती डिमरी ‘आशिकी 3’ साठी कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे, ज्याला साइन करण्यात आले आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे शूटिंग 2024 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. सप्टेंबरमध्येही कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामच्या माध्यमातून ‘आशिकी 3’चे पोस्टर रिलीज केले होते. पण हिरोईन शोधण्यासाठी निर्मात्यांना 3 महिने लागले.
सध्या या चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे निश्चित झाली नसून, यावरही लवकरच काम सुरू होणार आहे. याआधी राहुल रॉय आणि अनु अग्रवाल 1990 मध्ये रिलीज झालेल्या ‘आशिकी’मध्ये एकत्र काम करताना दाखवण्यात आले होते. तर ‘आशिकी 2’ मधील आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.