मुंबई – अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी तो जोरदार तयारी करत आहे. पात्रात येण्यासाठी त्याने डाएटिंग सुरु केली. अलीकडेच कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे खुलासा केला की, त्याच्या चित्रपटाचे शूटिंग आता संपले आहे. यासोबतच तो आईस बाथ करतानाही दिसत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे अॅक्शन शेड्यूल पूर्ण केले. शूट पूर्ण केल्याच्या सेलिब्रेशनमध्ये कार्तिक स्नो बाथ करताना दिसला. कार्तिकने हा क्यूट व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला, ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कार्तिकने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिप शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नदीतील बर्फात आंघोळ करण्याचा अनुभव पहिल्यांदाच येत आहे. यासोबत पॉवर पॅक्ड अॅक्शन शेड्यूल संपले, तेही काश्मीरमध्ये.”कार्तिकने हा व्हिडिओ शेअर करताच अनेक यूजर्सने त्याच्या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली.
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये दिसला. या चित्रपटात त्याच्या सोबत कियारा अडवाणी दिसली होती. साजिद नाडियादवाला कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. एका क्रीडा व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गेल्या महिन्यात कार्तिकने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर केला होता.