Karpoori Thakur : भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या लोकप्रियतेमुळे जननायक म्हटले जाते. त्यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर येथे झाला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाने ही घोषणा केली.
कर्पुरी ठाकूर हे स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि राजकारणी म्हणून ओळखले जात होते. बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या कर्पूरी ठाकूर यांनी राजकीय जीवनात आपली तत्त्वे सोडली नाहीत. कर्पूरी ठाकूर यांनी भारत छोडो आंदोलनात उडी घेतली.
I am delighted that the Government of India has decided to confer the Bharat Ratna on the beacon of social justice, the great Jan Nayak Karpoori Thakur Ji and that too at a time when we are marking his birth centenary. This prestigious recognition is a testament to his enduring… pic.twitter.com/9fSJrZJPSP
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2024
त्यामुळे त्यांना 26 महिने तुरुंगात राहावे लागले. 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 आणि 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. समाजवादी विचारसरणीवर जगणारी कर्पूरी ठाकूरसारखी व्यक्ती दिसणे फार दुर्मिळ आहे. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे.