बेंगळुरू – देशात कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे 185 बालविवाहांची नोंद 2020 या वर्षात झालेली आहे. 2019 च्या तुलनेत या राज्यात बालविवाहांमध्ये तब्बल 66 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातून स्पष्ट होत आहे. कर्नाटकनंतर आसाम (138), पश्चिम बंगाल (98), तमिळनाडू (77), तेलगंणा (62) या राज्यांमध्ये 2020 या वर्षात बालविवाहांची लक्षणीय नोंद झालेली आहे.
कर्नाटकातील महिला व बालकल्याण खात्याच्या माहितीनुसार फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत म्हणजेच करोनाची लाट तीव्र असतानाच्या काळात राज्यात 2,074 बालविवाह रोखण्यात आले आहेत.
सर्वाधिक म्हणजे बळ्ळारी जिल्ह्यात 218 बालविवाह रोखण्यात आले तर म्हैसूर (177), बेळगाव (131) बालविवाह रोखण्यात आले. याच कालावधीत बेंगळुरू शहरामध्ये 20 बालविवाह रोखण्यात आले. वय लपवण्यासाठी मुलींची दोन आधारकार्डे फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यभरात बालविवाह प्रकरणी 108 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.