बंगळुरू – कर्नाटकच्या एका महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी एका विद्यार्थ्याला कसाब म्हटल्यामुळे त्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले असून चौकशी सुरू आहे. मात्र हा काही मुद्दा नसल्याचे कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटले आहे.
भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक – राज्यपाल कोश्यारी
ते म्हणाले, प्राध्यापकाने असे बोलायला नको होते. पण आता हा राजकीय मुद्दा करण्यात आला आहे. खरेतर हा काही मोठा मुद्दा नाही. आपण कितीतरी वेळा रावण, शकुनी या नावांचा वापरत करतो. पण आता कसाबबद्दल बोलले गेले तर मुद्दा झाला. एमआयएमचे खासदार ओवेसी यांनीही या विषयात उडी घेतली असून प्राध्यापकावर टीका केली.
द्वेष आता गरिब- श्रीमंतांच्या घरातून बाहेर पडत आता खासगी महाविद्यालयांपर्यंत पोहोचला आहे. अल्पसंख्य समुदायाशी संबंध ठेवणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र त्या विद्यार्थ्याने प्राध्यापकाशी जशी चर्चा केली तसेच आपल्याला करावे लागेल. डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारावे लागतील. हातात दगड घेऊन काही होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.