बुधवारी कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्‍यता

नवी दिल्ली – कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवार, 13 जानेवारी रोजी होण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी 7 नावांची निश्‍चिती करण्यात आली आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. त्यामुळे या सर्वांचा शपथविधी 13 जानेवारी रोजी केला जाईल. या नवीन मंत्र्यांची नावे आणि त्यांच्याकडील खात्यांची नावे लवकरच सांगितली जातील, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.

जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आपण लवकरच “गुड न्यूज’ देणार असल्याचे येडियुरप्पा म्हणाले होते. अमित शहा यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीच्यावेळी नड्डा, येडियुरप्पा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अरुण सिंह हे देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेबद्दलची माहिती देताना येडियुरप्पा यांनी राज्यातील नेतृत्वात बदल होणार का?” या प्रश्‍नाला उत्तर देणे टाळले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.