पिंपरी: 5 हजाराची लाच घेताना एजंट अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पिंपरी – पिंपरी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाच हजारांची मागणी करण्यात आली. यातील तेराशे रुपये स्वीकारताना एका खासगी एजंटला रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. ११) रात्री ही कारवाई केली.

अक्षय मारुती माळवे (२४, रा. गंगानगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या मित्राची गाडी ट्रान्सफर करायची आहे. त्यासाठी त्यांना पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. दरम्यान, आरोपी अक्षय याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.

याविरोधात तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सोमवारी रात्री अक्षय याला तेराशे रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.