पुणे- विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, कर्जत – जामखेडमधून रोहित पवार जवळपास 41544 मतांनी आघाडीवर आहेत. तर राम शिंदे 29329 मतांनी पिछाडीवर आहे. अत्यंत अटीतटीची लढत झालेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात कोण जिंकणार?याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तिसऱ्यांदा रिंगणात असलेल्या प्रा. राम शिंदेंना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या माध्यमातून नवा चेहरा मतदारसंघाचे नेतृत्व करणार. याविषयी सगळीकडे उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे.