कापूरहोळ -कापूरहोळ (ता. भोर) येथील एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारी म्हणून बाजारपेठ बंद ठेवली आहे.
कापूरहोळ येथे आढळलेला हा रुग्ण सासवड येथे एका बॅंकेत नोकरीनिमित्त ये-जा करीत होता कामाच्या ठिकाणी करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाने गाव व बाजारपेठ परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. विनाकारण बाहेर फिरताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दराडे यांनी सांगितले.