मुंबई – अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे अधिक चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. तिच्या चित्रपटांविषयी किंवा विविध मुद्द्यांवर ती सोशल मीडियावर आपले मत मांडत असते. मात्र आता कंगणाने एक गुडन्यूज दिली आहे. लवकरच कंगणा आत्या होणार आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर वहिनी रितूच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
कंगनाची वहिनी रितू लवकरच आई होणार आहे. नुकताच त्यांचा बेबी शॉवरचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी कंगणासह परिवारातील सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी, गळ्यात नेकलेस आणि केसांमध्ये गजरा घातल्याचे दिसते. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यावेळी ती कुटूंबासोबत डान्स करत धमाल, मस्ती करताना देखील दिसते. यातील एका फोटोमध्ये कंगणा तिच्या भावजयीला सुंदर नेकलेस गिफ्ट करत असल्याचेही दिसते.
View this post on Instagram
कंगणाच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याशिवाय कंगणाच्या या पोस्टवर अभिनेता अनुपम खेर यांनीही अभिनंदन केले आहे. कंगनाचा भाऊ अक्षतचं रितू सांगवान हिच्याशी नोव्हेंबर 2020 लग्न झालं होते. त्यांचं लग्न राजस्थानच्या प्रसिद्ध उदयपूर शहरामध्ये झाले होते. या लग्नाला राजस्थानी थीम ठेवण्यात आली होती.