मुंबई – कंगणा रणावतने “मणिकर्णिका’च्या निमित्ताने डायरेक्शनच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. आता ती आणखीन एका सिनेमाचे डायरेक्शन करणार आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावरील सिनेमाचे डायरेक्शन ती करणार आहे.
अर्थात, लीड रोल ती स्वतःच करणार हे नक्की आहे. पण ऍक्टिंगबरोबर ती या सिनेमाचे डायरेक्शनदेखील करणार आहे. या रोलची तयारी म्हणून तिने दोनच दिवसांपूर्वी चेहरा आणि देहयष्टीचे स्कॅनिंग केले आहे. आपण या सिनेमाचे डायरेक्शन करणार असल्याचे तिने स्वतःच सोशल मीडियावर घोषित केले आहे.
View this post on Instagram
हा सिनेमा आपल्याशिवाय अन्य कोणीही अधिक चांगल्याप्रकारे डायरेक्ट करू शकणार नाही. या सिनेमासाठी ऍक्टिंगची काही कामे सोडायला लागली तरीही या डायरेक्शनवरच आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंगणाने म्हटले आहे. इंदिरा गांधींवरील या सिनेमाचे शीर्षक “इमर्जन्सी’ असे असणार आहे.
नावावरूनच हा सिनेमा आणीबाणीवर आधारलेला असेल हे उघड आहे. कंगणाच्या म्हणण्यानुसार हा इंदिरा गांधींचा बायोपिक नसेल आणि त्याचे स्वरूप पॉलिटिकल ड्रामा असे असणार आहे.
सध्याच्या भारताची सामाजिक-राजकीय जडणघडण आजच्या पिढीला समजायची असेल, तर हा सिनेमा व्हायलाच हवा असे ती म्हणाली.