मुंबई – अभिनेता आणि स्वघोषित समीक्षक कमाल रशिद खान म्हणजेच ‘केआरके’ आपल्या सुमार अभिनयासाठी ओळखला जातो. केआरकेचा एकही सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर कोणतीच कमाल दाखवू शकलेला नाहीये.
मात्र हाच केआरके सोशल नेटवर्किंगवरील त्याच्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यासाठी नेटकरी त्याला ट्रोलही करतात परंतु केआरकेला त्याचाही काहीही फरक पडत नाही. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच तो असे कारनामे करत असावा असा आरोप नेटकरी त्याच्यावर करतात.
दरम्यान, केआरकेने आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक भविष्यवाणी केलीय आणि त्यामुळेच केआरके पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने नरेंद्र मोदी आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात ट्विट केलं आहे.
“माझ्या आजच्या अंदाजानुसार, पंतप्रधान मोदीजी 2024 मध्ये क्लीन बोल्ड बाद होणार..’ असं केआरकेने ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याचे हे ट्विट सोशलवर चांगलेच व्हायरल झाले.