Kangana Ranaut – अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अलीकडेच मुंबईतील एका सलूनमध्ये एका मिस्ट्री मॅनसोबतचे तिचे फोटो तर आता 22 जानेवारीला EaseMyTrip चे संस्थापक निशांत पिट्टीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून चाहते या दोघांच्या अफेर्सच्या चर्चा करत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावल्या जात आहे. या सर्व चर्चांवर आता कंगनाने मौन सोडले आणि या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर अशी खोटी चर्चा करू नका, असे आवाहन तिने केले आहे.
EaseMyTrip चे संस्थापक निशांत पिट्टीसोबत डेटिंगच्या अफवांना पूर्णविराम देत, कंगना म्हणाली की,’ते ‘विवाहित’ आहे आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे. कंगनाने अयोध्येत EaseMyTrip च्या संस्थापकासोबत फोटो काढला, हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात दोघांनी एकत्र पोज दिली.’
तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, ‘माझी मीडियाला नम्र विनंती आहे, कृपया चुकीची माहिती पसरवू नका, निशांत पिट्टीचे लग्न झाले आहे आणि मी दुसऱ्या कुणाला डेट करत आहे. योग्य वेळेची वाट पहा.’कंगनाच्या डेटिंग लाइफबाबत खुलासा केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी 14 जून रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, कंगना तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.