Sanjay Leela Bhansali : बॉलीवूड निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. रामलीला, बाजीराव मस्तानी यासारख्या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. संजय लीला भन्साळी ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहेत. बॉलीवूडमधील आघडीचे लोकप्रिय तीन कलाकार या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
तरण आदर्श यांनी या चित्रपटाबद्दल माहिती शेअर केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमला म्हणजेच २०२५ मध्ये डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होईल. या तिघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनाही उत्सुकता लागली आहे. विकी कौशलने देखील त्याच्या सोशल मीडियावरुन संजय लीला भन्साळींच्या या नव्या सिनेमाबाबत अपडेट दिली आहे. विकीने या सिनेमाचं पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाव आणि सही दिसत आहे.
View this post on Instagram
संजय लीला भन्साळींबरोबर विकी कौशलचा हा पहिलाच सिनेमा आहे. तर रणबीर कपूरचा संजय लीला भन्साळींसोबतचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी रणबीरने सावरिया सिनेमातूनच 2007 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आलियाही गंगूबाई काठियावाडी सिनेमानंतर पुन्हा एकदा भन्साळींबरोबर काम करताना दिसणार आहे. दरम्यान, बाजीराव मस्तानी आणि रामलीला या चित्रपटासह संजय लीला भन्साळी यांचे हम दिल दे चुके सनम, देवदास हे चित्रपट देखील सुपरहीट ठरले होते. आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते.