Bollywood News – अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन सध्या त्यांच्या ‘तेरी बातों में उल्झा जिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोघांची सिझलिंग केमिस्ट्री लोकांना आवडते. नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘अखियां गुलाबी’ रिलीज केले, ज्यामध्ये शाहिद आणि क्रितीच्या डान्स मूव्ह्सवर चाहतेही फिदा झाले आहे.
View this post on Instagram
सध्या दोन्ही स्टार्स त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, अशात शाहिद आणि क्रिती मुंबई विमानतळावर एकत्र दिसले यावेळी कॅमेरामध्ये क्रितीच्या एटिट्यूडमुळे सोशल मीडिया युजर्स नाराज झाले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिती आणि शाहिद एकत्र विमानतळावरून जातांना दिसत आहे. यावेळी, समोर एक फॅन दिसल्यावर शाहिद तिला जवळ येण्याचा इशारा देतो आणि ती धावत जाऊन क्रिती आणि शाहिदच्या मध्ये पोहोचते. ती शाहिदशी बोलते, नंतर तिने क्रितीकडे हात पुढे केला. यावेळी व्हिडिओमध्ये क्रिती तिला दुर्लक्ष करते, या व्हिडिओवर युजर्स आता संमिश्र कमेंट्स करत आहे.
हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी त्या मुलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे क्रितीला टार्गेट करायला सुरुवात केली. काही जण म्हणाले- आदिपुरुषच्या फ्लॉपच्या धक्क्यातून ती अजून सावरलेली नाही असे दिसते.’ दरम्यान, क्रिती आणि शाहिदची ही ‘लव्हस्टोरी’ यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ‘आदिपुरुष’नंतर क्रिती आणि निर्मात्यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहे.