मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत (kangana Ranaut) गुरुवारी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत (Ayodhya) पोहोचली. यावेळी तिने राम मंदिर आंदोलनात प्राण गमावलेल्या स्वयंसेवकांचे स्मरण करून अयोध्येत उभारलेले राम मंदिर हे हिंदूंच्या शतकानुशतकांच्या संघर्षाचे फलित असल्याचे म्हंटले आहे.
आगामी काळात अयोध्या (Ayodhya Ram Mandir) हे हिंदूंचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनेल. 22 जानेवारी रोजी येथे प्राणप्रतिष्ठा आयोजित केली आहे. हे आपल्या पिढीचे भाग्य आहे की आज आपण हा दिवस पाहू शकलो आहोत जे केवळ मोदी सरकारमुळेच शक्य झाले आहे असं देखील कंगना यावेळी म्हणाली.
राम लल्लाच्या (Ramlalla Darshan) दरबारात हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कंगना म्हणाली, व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवर अयोध्या हे सर्वात मोठे धार्मिक केंद्र बनणार आहे. हे सनातन संस्कृतीचे सर्वात मोठे केंद्रही असेल.600 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे. राम मंदिराशी करोडो लोकांच्या भावना जोडल्या आहेत, ते जगातील सर्वात सुंदर तीर्थक्षेत्र बनणार असल्याचा विश्वास देखील कंगनाने यावेळी व्यक्त केला.
View this post on Instagram
‘तेजस’ (Tejas Movie) या वायुसेनेवर आधारित चित्रपटात राम मंदिराचीही (Ram Mandir) महत्त्वाची भूमिका असेल असं देखील कंगनाने यावेळी सांगितले. तेजस चित्रपटाच्या यशासाठी कंगना विविध प्रकारच्या प्रमोशनचा अवलंब करत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री दिल्लीतील रामलीला येथे रावण दहन करण्यासाठी देखील आली होती. तेजस या चित्रपटात कंगना महिला फायटर पायलट तेजस गिलची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले आहे, तर निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.