“धाकड’साठी कंगणा घेते आहे बॉक्‍सिंगचे धडे

धाकड या आगामी सिनेमासाठी कंगणा रणावत सध्या बॉक्‍सिंग शिकते आहे. या बॉक्‍सिंगच्या ट्रेनिंगचे काही फोटो तिने अलिकडेच शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये तिने “धाकड’चे ऍक्‍शन डायरेक्‍टर जेसन एनजी आणि ब्रेट चॅन यांच्या बरोबरचे रिहर्सलचे फोटो शेअर केले आहेत.

यापूर्वी “मणिकर्णिका’मध्ये झांशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या रोलसाठी तिने तलवारबाजीही शिकून घेतली आहे. “धाकड’साठी बॉक्‍सिंग शिकत असतानाच ती दुसरीकडे “थलायवी’चे शुटिंगदेखील करते आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर लढायला लागत असल्याचे कंगणाने म्हटले आहे. अशा प्रकारे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या प्रोजेक्‍टसाठी काम करायला आवडत नाही.
सुरुवातीच्या काळात जशी सर्व कामे करायची तयारी ठेवायला लागली होती.

तेंव्हा अक्षरशः घोड्यासारखे काम केले होते. तसेच आताही करायला लागते आहे. म्हणून “थलायवी’चे शुटिंग सुरू असतानाच “धाकड’साठी बॉक्‍सिंगची रिहर्सलही सुरू ठेवल्याचे तिने सांगितले. “थलायवी’ आणि “धाकड’ व्यतिरिक्‍त ‘तेजस’ या देशप्रेमावर आधारीत सिनेमातही कंगणा काम करणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.