मुंबई – सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर सिनेसृष्टीतील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघाले आहे. या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. अशातच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरावर एनसीबीने छापा टाकला आहे.
माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने ही छापेमारी केली आहे. यावेळी भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छापेमारीदरम्यान काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असल्याचे समजत आहे.
Narcotics Control Bureau conducts a raid at the residence of comedian Bharti Singh in Mumbai: NCB#Maharashtra
— ANI (@ANI) November 21, 2020
दरम्यान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह, साराअली खान, अर्जुन रामपाल आणि दीपिका पदुकोण यांची देखील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.