एका दिवसाचे मानधन दोन कोटी रुपये

अक्षय कुमारच्या कामाचा झपाटा जबरदस्त आहे. त्याने भराभर सिनेमांचे शुटिंग पूर्ण केले आहे. करोनाच्या साथीमुळेही अक्षयच्या कामाची गती कमी झालेली नाही. सिनेमांच्या शुटिंगला पुन्हा सुरुवात झाल्यावर अक्षयचा “लक्ष्मी’ पूर्ण झाला आणि आता अक्षयने मुदस्सर अझिजचा नवीन कॉमेडी सिनेमाही स्वीकारला आहे. या सिनेमासाठी अक्षय 50 दिवस शुटिंग करणार आहे आणि त्याने मानधन म्हणून 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

म्हणजे अक्षयच्या एका दिवसाच्या कामाचे मानधन झाले तब्बल 2 कोटी रुपये. अक्षयच्या या अवाढव्य मानधनाव्यतिरिक्‍त आणखी 50 कोटी रुपयांमध्ये संपूर्ण सिनेमाचे प्रॉडक्‍शन होणार आहे. म्हणजे एकूण 100 कोटी रुपये हे या सिनेमाचे बजेट आहे. वेगवेगळ्या प्रसारण हक्कांचे मिळून 90 कोटी रुपये सिनेमाच्या रिलीजच्या आगोदरच निर्मात्यांना मिळणार आहेत.

उरलेल्या रुपयांची वसुली होण्यासाठी या सिनेमाला थिएटरवर कमीत कमी 120 कोटी रुपयांचा धंदा करावा लागणार आहे. अक्षयच्या सिनेमासाठी ही अगदी किरकोळ गोष्ट आहे. त्यामुळे हा सिनेमा यशस्वी होणार हे निश्‍चित आहे. अक्षय कुमार याच फॉर्म्युल्यावर काम करत असतो. त्यामुळे त्याच्या सिनेमातून सगळ्यांचीच कमाई होत असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.