कुणाल कामरा-संजय राऊत यांच्यातील ‘जेसीबी’ भेटीवरून कंगना संतापली

मुंबई –  स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमीच वादग्रस्त वक्‍तव्य करून चर्चेत राहतो. यावेळी  तो पुन्हा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. कुणाल लवकरच  ‘शटअप या कुणाल – २ ’  कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु करणार आहे. यातच कुणालने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केलं आहे. संजय राऊतांनी निमंत्रण स्वीकारले .

यावेळी कुणालच्या ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये कुणालने राऊतांना जेसीबी भेट दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. मात्र, यावर अभिनेत्री  कंगना राणावतने नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच संजय राऊत आणि कुणाल कामरा यांच्यावर निशाणादेखील साधला आहे.

काय म्हणाली कंगना 

“भलेही माझे प्रचंड मोठा प्रमाणात भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या  खच्चीकरण करण्यात आलं. मात्र  यातून महाराष्ट्र सरकार आणि त्याची अकार्यक्षमता व राजकीय डावपेच दिसून आला. त्यांच्या भोळेपणावरील पडदा दूर होताना दिसतोय.’

ती पुढे म्हणाली,’ माझ्या घरावरील अवैध बांधकाम म्हणत केलेल्या कारवाईची अशी चेष्टा? यावरुनच सगळं स्पष्ट होतंय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.